वेरुळ येथे ओम जगद्गुरु जनशांती धर्मसोहळ्याचे आयोजन

Foto
भव्य सोहळ्याची पूर्व तयारी आता अंतीम टप्प्यात
खुलताबाद, (प्रतिनिधी) : ब्रह्मलीन जगगुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या ३६ व्या पुण्यस्मरणनिमित्त ओम जगदुरु जनशांती धर्मसोळ्याचे आयोजन श्रीक्षेत्र वेरूळ येथे करण्यात आले आहे. उत्तर अधिकारी जगदुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या पर्व काळामध्ये होणार आहे.

या भव्य सोहळ्याची पूर्व तयारी सध्या मोठ्या उत्साहात मध्ये वेरूळ येथे श्री संत जनार्दन स्वामी आश्रम परिसरामध्ये सुरू आहे. जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने उत्तर अधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत राजेंद्र पवार यांनी माहिती दिली. 

सालाबाद प्रमाणे परमपूज्य बाबाजींचे पुण्यस्मरण जय बाबाजी भक्त परिवार स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी उत्साहामध्ये साजरा करण्यात येतो. सोहळ्यात नऊ जिल्ह्यातील ६७तालुक्याचा प्रामुख्याने सहभाग असून महाराष्ट्र सह संपूर्ण भारतामधून अनेक पूजनीय साधुसंत व मान्यवर सहभागी होणार आहे. आठ दिवस लाखो भाविकांची मंदियाली परिसरामध्ये होणार आहे. दोन महिन्यात पासून या सोहळ्याची तयारी चालू आहे, तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. 

आश्रम परिसरामध्ये या सोहळ्याचं वैशिष्ट्य असलेले बाबाजींनी दिलेली अनुष्ठान परंपरा यासाठी ११ हजार भाविकांचा सहभाग असून आठ दिवस मौनवृत्तामध्ये राहून परमपूज्य बाबाजींनी दिलेला अनुग्रह याचा ते जप करतील. यांच्या व्यवस्थेसाठी एक लाख स्क्वेअर फुटाचा वैजापूर येथील शर्मा मंडप यांचा वॉटरप्रूफ मंडप देण्यात आला आहे. दुसरी महत्त्वाची परंपरा परमपूज्य बाबाजींनी दिली आहे. ती यज्ञ यासाठी राजस्थानी शैलीतील राजस्थानी कारागिरांनी बनवलेला बांबू व गवत यापासून जवळपास दोन एकरमध्ये भव्य मंडप उभारण्यात आला आहे.

 या यज्ञ मंडपामध्ये ७५१ कुंड याची निर्मिती केली असून आठ दिवस या यज्ञामध्ये जवळपास
२५ हजार भाविक सपत्नीक सहभागी होऊन यज्ञाचा लाभघेतील या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे बाबाजींनी दिलेली श्रमदान परंपरा यानुसार एक कोटी तास श्रमदानाची नोंद होणार आहे अनुष्ठानासाठी बसणाऱ्या ११, ००० भाविकांकडून १११ कोटी जप होणार आहे.
यज्ञासाठी बसणारे २५, ००० भाविकाकडून सव्वा कोटी यज्ञ आहुती म्हणजे हवन होणार आहे यासोबत या सोहळ्यामध्य अखंड नंदादीप, नामस किर्तन अभिषेक, एकनाथी भागवत पारायण व दररोज येणाऱ्या लाखो भाविकांसाठी अखंड अन्नदान त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व आरोग्याची व्यवस्था याचे नियोजन केले आहे.